अहमदनगर: ‘अनेक दिवस प्रलंबित असणारे कृषी विधयक मोदी सरकारने पारित केले व भारत देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली. त्याविरोधात ” चा नारा जे देत आहेत, तेच शेतकरी विरोधी आहेत हे सिद्ध करतायत,’ असा घणाघात माजी मंत्री प्रा. यांनी केला. ‘कृषी विधेयक विरोधात दिलेल्या ‘भारत बंद’ मध्ये कोणतेही तथ्य नाही. हा केवळ पोकळ वासा आहे. याचा संबंधित संघटना भविष्यात पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,’ असा टोलाही त्यांनी लगावला. ते नगरमध्ये बोलत होते.

संसदेत विरोधकांचा विरोध डावलून केंद्र सरकारने कृषी विधेयक सहमत केले आहे. या कृषी विधेयकाविरोधात विविध शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’आंदोलन सुरु केले. हे आंदोलन पुकारणाऱ्या संघटनांवर माजी मंत्री शिंदे यांनी निशाणा साधला.

वाचा:

‘कृषी विधेयक केंद्र सरकारने आणले. हे विधेयक अनेक दिवसांपासून प्रलंबित होते, ते सरकारने पारित करीत देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र काही जण ‘भारत बंद’ची हाक देऊन शेतकरी विरोधी भूमिका मांडण्याचा प्रयत्न देशामध्ये करत आहेत. हे विधेयक नेमके काय आहे ? त्यातील तरतुदी काय आहेत ? शेतकऱ्यांना काय सुविधा मिळणार आहेत ? हे जर बारकाईने अभ्यासले तर हे शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक आहे, हे लक्षात येते. संपूर्ण देशातील शेतकरी या विधेयकाच्या बाजूने राहतील, असा विश्वास आहे. मात्र काही जण ‘भारत बंद’ची हाक देऊन ते स्वतःच शेतकरी विरोधी आहेत, हे सिद्ध करतात. देशात सरकार यशस्वीरित्या काम करत आहे. अशा वेळी विरोधकांकडे कोणताही मुद्दा नसतो. तेव्हा एखाद्या विधेयकांवर संभ्रम निर्माण केला जातो. कारण विधेयक सविस्तर अनेक जण वाचत नसतात. सध्या असाच प्रयत्न काही शेतकरी संघटना करताना दिसत आहेत. ज्यांना शेतकऱ्यांचा खरच कळवळा आहे, त्यांनी या विधेयकाचे स्वागत करणे गरजेचे आहे,’ असेही ते म्हणाले.

वाचा: वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here