ठाणे: राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना करोनाची लागण झाली आहे. शिंदे यांना झाल्याचं समजताच मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. गृहनिर्माण मंत्री यांनीही एक ट्वीट करत शिंदे यांना लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

‘मंत्रिमंडळातील माझे लढवय्ये सहकारी एकनाथ शिंदे हे करोनाग्रस्त झाल्याचे कळले. एका जागी बसण्याचा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळं ते पुढील काही दिवसातच ते आपल्यामध्ये करोना विरुद्धची लढाई लढताना दिसतील,’ असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. ‘लवकर बरे व्हा,’ अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत.

करोना नंतरच्या मागील सहा महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत आहेत. राज्य सरकारमधील मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडतानाच ते आपल्या मतदारसंघातही सक्रिय होते. त्यातून ते अनेकांच्या संपर्कात आले होते. खबरदारी म्हणून त्यांनी बुधवारी ‘कोविड १९’ ची चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांनी स्वत: ट्वीट करून काल ही माहिती दिली. त्यानंतर अनेक सहकाऱ्यांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पूर्ण बरे होईपर्यंत आराम करा, असा सल्ला शिंदे यांना दिला आहे.

वाचा:

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे व जितेंद्र आव्हाड हे दोन्ही नेते अनेकदा समोरासमोर आलेले दिसायचे. मात्र, आता या दोन्ही नेत्यांमधील जवळीक वाढली आहे. मंत्रिमंडळाबरोबरच जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर ते एकत्र काम करताना दिसतात.

वाचा:

राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. खुद्द जितेंद्र आव्हाडांनाही करोनाने गाठले होते. जवळपास महिनाभराच्या उपचारानंतर त्यांनी करोनावर पूर्णपणे मात केली. आता पुन्हा एकदा ते सक्रिय झाले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here