मुंबई टाइम्स टीम

बॉलिवूडमधील टॉप स्टार्सना ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगामी सिनेमांसाठी तगडं मानधन दिलं जात आहे. या यादीमध्ये आता अभिनेता शाहिद कपूरचं नाव जोडलं गेलं आहे. गेल्या महिन्यात आयुषमान खुराणा आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो-सिताबो’, विद्युत जामवालचा ‘खुदा हाफिज’, कुणाल खेमूचा ‘लूटकेस’ आणि आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्तचा ‘सड़क २’ यांच्यासह अनेक सिनेमे ऑनलाइन रिलीज करण्यात आले आहेत. अशात बॉलिवूडमधील टॉप स्टार्सना ओटीटी प्लॅटफॉर्मवर आगामी चित्रपटांसाठी चांगली रक्कम दिली जात आहे.

शाहिदला नेटफ्लिक्सनं काही नव्या प्रोजेक्ट्ससाठी साइन केलंय. इतकंच नाही, तर शाहिदनं या प्रोजेक्ट्ससाठी नेटफ्लिक्ससोबत १०० कोटी रूपयांचं डील साइन केल्याची चर्चा आहे.

शाहीद केवळ नेटफ्लिक्स सिनेमा किंवा सीरिजसोबत आपलं डिजिटल डेब्यू करेल. इतकंच नाही तर अनेक प्रोजेक्ट्सवर काम करेल. शाहिदनं अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या त्याच्या आगामी ‘जर्सी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. लॉकडाउनमुळे या सिनेमाचं चित्रीकरण मध्येच थांबवण्यात आलं होतं. गौतम तिन्ननुरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या सिनेमात शाहिदसोबत मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here