टोकियो: आशिया खंडात चीनच्या वाढत्या दादागिरीला आळा घालण्यासाठी भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी घट्ट होत आहे. चीनला वेसण घालण्यासाठी भारत आणि जपान एकत्र येणार असून जपानचे पंतप्रधान सुगा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांतील आर्थिक आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. तर, जपानच्या पंतप्रधानांनी क्वाडची सूचना केली आहे.

जपानचे पंतप्रधान योशिदे सुगा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चर्चा केली. इंडो-पॅसिफिक भागासाठी भारत-जपान-ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत परस्पर सहकार्य वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सुगा यांनी म्हटले. या चारही देशांनी चीनविरोधात ‘क्वाड’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय जपानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र संघातही परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. आशियाई भागात नाटोच्या धर्तीवर क्वाडची रचना करण्यात येणार आहे. यामुळे चीनच्या दादागिरीवर आळा बसून वचक राहिल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाचा:

वाचा:

चीनचा धोका लक्षात भारत आणि जपानचे लष्करप्रमुक सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत. मागील आठवड्यातच जपानी सैन्याचे चीफ ऑफ स्टाफ जनरल युसा यांनी भारतीय लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांच्याशी चर्चा केली होती. या दोन्ही देशांच्या सैन्यांनी इंडो-पॅसिफिक भागात चीनच्या वाढत्या घुसखोरीला प्रतिबंध करण्यावर सहमती दर्शवली आहे.

सप्टेंबरमध्येच जपानने भारतासोबत संरक्षण क्षेत्रात लॉजिस्टिक आणि इतर बाबींसाठी करार केला होता. नवी दिल्लीत झालेल्या या करारावर भारताच्यावतीने संरक्षण सचिव अजय कुमार आणि जपानच्यावतीने भारतातील जपानचे राजदूत सुझुकी सतोशी यांनी सहभाग घेतला. या करारानुसार आता भारतीय लष्कर जपानकडून आणि जपानी लष्कर भारताकडून आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे आदान-प्रदान करू शकणार आहेत.

वाचा:

पूर्व चीन समुद्रात चिनी युद्धनौकांच्या वाढत्या घुसखोरीमुळे जपान अस्वस्थ आहे. जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनो यांनी भारताला व्यापक क्षेत्रीय सहकार्य विकसित करण्याची सूचना केली होती. इंडो-पॅसिफिक भागात भारत आणि जपानने एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here