प्रतापगढः उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातून एक अनोखी घटना समोर आली आहे. प्रतापगडमधील उप जिल्हाधिकारी विनीत उपाध्याय यांनी जिल्ह्यातील सर्व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर अधिकारी विनीत उपाध्याय हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानावर धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्यांची पत्नीदेखील या आंदोलनात त्यांना साथ देत आहे.

प्रतापगडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पत्नीसमवेत उपजिल्हाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केल्याने उत्तर प्रदेशातील नोकरशाहांमध्ये खळबळ उडाली आहे. शाळेचा योग्य अहवाल तयार करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप, आंदोलनावर बसलेल्या उपजिल्हाधिकारी विनीत उपाध्याय यांनी केला आहे. जिल्ह्यातील लालगंज भागातील एका शाळेच्या अहवालावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव आणल्याचं सांगितलं जातंय.

याशिवाय धरणे आंदोलनावर बसलेल्या उप जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतापगडचे जिल्हाधिकारी रूपेश कुमार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. पीसीएस अधिकारी विनीत उपाध्याय यांची प्रतिमा प्रामाणिक अधिकारी अशी आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. आंदोलनाला बसलेले अधिकारी विनीत उपाध्याय यांचा फोटोही समोर आला आहे.

यूपीमध्ये करोना किट खरेदी करताना भ्रष्टाचार उघडकीस आला होता. त्यानंतर या घोटाळ्यात दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी सरकारने एसआयटीची स्थापना केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here