पुणे: बाधित रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयांनी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे कुठल्याही रुग्णालयाने त्याहून जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आज दिला. ‘ ‘ मोहिमे अंतर्गत करोनाचे निदान होवून वेळेत उपचार करणे सुलभ होणार असल्याने ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले. ( Takes Review Of Situation In )

वाचा:

विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरांसह जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे. या मोहिमेमुळे करोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल. त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले.

वाचा:

करोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी इतर आवश्यक उपचाराबाबतही दक्षता घेण्याच्या सूचना करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, करोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेता उपचारासाठीच्या सुविधाही सातत्याने वाढविण्यात येत आहेत. करोनाच्या संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. करोना साथीला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

वाचा:

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे महापालिकाही सातत्याने उपचार सुविधांमध्ये वाढ करते आहे. जम्बो रुग्णांलयामध्येही उपचार सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी करोना स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगरपालिका क्षेत्रातील करोना संसर्गाबाबतची स्थिती, उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद तसेच उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांनी कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. या बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here