आबुधाबी: पृथ्वी सावचे दमदार अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्स संघावर विजय मिळवला. या सामन्यापूर्वी दिल्लीपेक्षा चेन्नईचे पारडे जड असल्याचे म्हटले जात होते. पण दिल्लीच्या युवा खेळाडूंची दमदार कामगिरी या सामन्याच पाहायला मिळाली. दिल्लीचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला.

दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचे सलामीवीर अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या सामन्यात चेन्नईला चांगली सुरुवात करता आली नाही. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ऋतुराज गायकवाडलाही यावेळी सूर गवसला नाही. ऋतुजला यावेळी फक्त पाच धावा करता आल्या. पण फॅफ ड्यू प्लेसिसने यावेळी चेन्नईचा किल्ला चांगलाच लढवला. फॅफ यावेळी ४३ धावांवर बाद झाला.

पृथ्वी सावच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला चेन्नई सुपर किंग्सपुढे १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. त्यानंतर चेन्नईच्या सलामीवीरांकडून मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. पण या सामन्यातही चेन्नईच्या दोन्ही सलामीवीरांना चांगली फटकेबाजी करता आली नाही.

चेन्नईने नाणेफेक जिंकली आणि दिल्लीच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. यावेळी दिल्लीचे दोन्ही सलामीवीर पृथ्वी आणि शिखर धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पृथ्वी आणि शिखर यांनी सावध सुरुवात केली आणि त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमणही केले. पृथ्वी आणि शिखर यांनी संघाला ९४ धावांची सलामी दिली

पृथ्वी आणि शिखर ही जोडी आता मोठी धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. पण चेन्नईचा फिरकीपटू पीयुष चावलाने ही जोडी फोडली. पीयुषने यावेळी शिखरला पायचीत पकडले. शिखरने यावेळी २७ चेंडूंत ३५ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूने पृथ्वी चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत होता.

पृथ्वीने यावेळी चेन्नईच्या गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. पृथ्वी आता शतक झळकावणार का, असे वाटत होते. पण पुन्हा एकदा पीयुष चावलाने संघाला यश मिळवून दिले. पीयुषने धवनला बाद केल्यावर आपल्या पुढच्याच षटकात पृथ्वीलाही तंबूचा रस्ता दाखवला. पृथ्वीने यावेळी ४३ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६४ धावांची खेळी साकारली.

चेन्नईच्या संघाकडून यावेळी फिरकीपटू पीयुष चावला हा यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात पीयुष चांगलाच महागडा ठरला होता. पण या सामन्यात पीयुषने दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करत संघाला दुहेरी यश मिळवून दिले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here