पंढरपूर: धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर नेते आमदार यांनी पुकारलेल्या ढोल बजाओ आंदोलनाला पंढरपूर येथे मोठा प्रतिसाद मिळाला. पडळकर यांच्या आवाहनानंतर राज्यभर गावोगावी धनगर समाजाने ढोल वाजवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. पंढरपुरात विठ्ठल मंदिरासमोरील चंद्रभागेच्या महाद्वार घाटावर पडळकरांच्या नेतृत्वाखाली ढोल वाजवण्यात आले. यावेळी महाद्वार घाटाच्या दोन्ही बाजूला धनगर आरक्षणासाठीची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती. सकाळपासूनच पंढरपुरात विविध भागातून धनगर समाजाचे कार्यकर्ते ढोल घेऊन दाखल होत होते. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी अतिशय चोख बंदोबस्त ठेवत मोजक्याच कार्यकर्त्यांना महाद्वार घाटावर सोडले. ( On )

वाचा:

पंढरपुरात आपण विठोबाच्या साक्षीने ढोल वाजवला आहे. या ढोलाच्या आवाजाने सरकार जागे होईल आणि देण्याबाबत अध्यादेश निघेल अशी आशा आहे. मात्र तसे झाले नाही तर लवकरच आणि समोर जाऊन पुढचे आंदोलन केले जाईल, असा इशारा पडळकर यांनी दिला.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी राज्यभर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा केंद्रबिंदू पंढरपुरात होता. पंढरपुरात आमदार पडळकर आणि भूषणसिंहराजे होळकर यांनी सहभाग नोंदवून ढोल वाजवत आरक्षणासाठी एल्गार केला. दुपारी बाराच्या सुमारास चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन पडळकर आणि भूषणसिंहराजे होळकर यांनी ढोल वाजवला. यानंतर त्यांच्यासमवेत आलेल्या शेकडो ढोल वादकांनीही बिरोबाच्या गझीच्या तालावर ढोल वाजवत आपले गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला.

वाचा:

मेंढ्यांप्रमाणे चालत येऊन दिले निवेदन

धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्यात यावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीसाठी धनगर समाजबांधवांच्या वतीने विविध आंदोलने करण्यात आली. शासनाकडून वेळोवेळी आरक्षण लागू करण्याचे आश्वासने देण्यात आली. परंतु, आजपर्यंत हा विषय मार्गी लागलेला नाही. आरक्षणाअभावी धनगर समाजातील तरुणांना शिक्षण घेताना तसेच नोकरीत अनेक अडचणी येत आहेत. अनेक सुविधांपासून ते वंचित राहत आहेत. त्यामुळे शासनाने धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण त्वरित लागू केले पाहिजे, या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आरक्षणाच्या मागणीसह धनगर समाजाशी निगडित महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जळगावातही धनगर ऐक्य अभियान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर ऐक्य अभियान संघटनेचे पदाधिकारी मेंढ्यांप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात चालत आले. त्यांनी धनगर समाजाची पारंपरिक वेशभूषा केली होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here