नवी दिल्लीः आणि एकाच वेळी भारतविरूद्ध मोर्चेबांधणी करू शकतात, अशी शंका व्यक्त केली जातोय. यामुळे अशा कोणत्याही स्थितीसाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे. दोन्ही आघाड्यांवर एकाचवेळी शत्रूशी लढण्यास आम्ही सक्षम आहोत, असं भारतीय हवाई दलाच्या जवानांनी शुक्रवारी सांगितलं.

हे फॉरवर्ड एअरबेस एक ठिकाण आहे. इथून पाकिस्तान अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे. तर भारतासाठी सामरिक दृष्टीकोनातून महत्त्वाचे असलेले दौलत बेग ओल्डी (DBO) हे लडाखमध्ये असलेले ठिकाण ८० किलोमीटर दूर आहे. या ठिकाणी दिवसरात्र लढाऊ, मालवाहून विमानं आणि हेलिकॉप्टर्स उड्डाणं घेतात आणि उरतात. यात सुखोई एमकेआय 30, सी -130 जे, सुपर हरक्यूलिस, इलुशिन 76 आणि अँटोन 32 यांचा समावेश आहे.

LAC वर पुरवली जातेय रसद
चीनशी सुरू असलेल्या तणाव लक्षात घेता इथं दिवसरात्र विमानांची उड्डाणं सुरू आहेत. मालवाहू विमानं ही जावन, रेशन, दारुगोळा घेऊन सतत उड्डाणं घेत आहेत. ही विमान पूर्व लडाखच्या डीबीओसह प्रत्यक्ष ताबा रेषेवरील लष्करी तळांवर सामान घेऊन जात आहेत. पाकिस्तान आणि चीन एकत्र येण्याची शक्यता पाहता पाकिस्तानच्या स्कार्दू एअरबेसचा भारताला धोका आहे का? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर हवाई दलाच्या लेफ्टनंट रँकवरील अधिकाऱ्याने उत्तर देत विश्वास व्यक्त केला. ‘भारतीय हवाई दल आधुनिक सुविधांमुळे पूर्णपणे तयार आहे आणि दोन्ही मोर्चांवर कोणतही कारवाई करू शकतं. हवाई दलाच्या घोष वाक्यानुसार, ‘गौरव से आसमान छू लो’ यानुसार आम्ही पूर्णपणे तयार आहोत आणि आमच्यात जोशही आहे, असं त्यांनी सांगितलं.

हवाई दल रात्रीच्या कारवायांसाठीही सक्षण

आपल्या लढाऊ क्षमतांचा मोठा विकास झाला आहे. आता आम्ही फॉरवर्ड बेसवरून रात्री सर्व प्रकारच्या मोहीमा पूर्ण करू शकतो, असं हवाई दलाच्या एका पायलटने सांगितलं. यापूर्वी जेव्हा गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतात एक चिनी ईंधन भरणारे विमान स्कार्दूमध्ये उतरल्यानंतर पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील पाकचा हा एअरबेस चर्चेत आला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here