मुंबईः बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ( ) च्या चौकशी सुरू आहे. यादरम्यान चित्रपट दिग्दर्शक ( ) याने एक पत्रक जारी केलंय. ‘माझ्या घरात ड्रग्स पार्टी ( was consumed in the party ) झाली नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. क्षितीज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नाही’, असं करण जोहर म्हणाला.

काही वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चुकीच्या पद्धतीने बातम्या देत आहेत, असं करण जोहर म्हणाला. एका पार्टीत ड्रग्जचे सेवन झाले होते. ही पार्टी २८ जुलै २०१९ ला माझ्या घरी आयोजित केली होती. या पार्टीबाबत मी यापूर्वीही स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात करण्यात येत असलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, असा दावा करण जोहरने केलाय.

सध्या सुरू असलेल्या हेतुपुरस्सर मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की सर्व आरोप निराधार आहेत. मी ड्रग्ज घेत नाही किंवा अशा कोणत्याही गोष्टीला प्रोत्साहन देत नाही, असं करण जोहर बोलला.

क्षितीज रवी प्रसाद ( ) आणि अनुभव चोप्रा ( anubhav chopra ) ना माझे जवळचे आहेत ना मी त्यांना वैयक्तिकरित्या ओळखतो. एखादी व्यक्ती आपल्या वैयक्तिक आयुष्यात जे करतो त्याबद्दल मी किंवा धर्मा प्रॉडक्शन जबाबदार नाहीत, असं त्याने सांगितलं.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी धर्मा प्रॉडक्शनचे कार्यकारी निर्माता क्षितीज रवी प्रसाद यांना प्रश्न विचारला आहे. धर्मा प्रॉडक्शन ही करण जोहरची कंपनी आहे.

शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास क्षितीज रवी प्रसाद याला चौकशीसाठी एनसीबीने ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here