नवी दिल्लीः करोना व्हायरस संकटामुळे यावेळी संयुक्त राष्ट्रांची आमसभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केली आहे. या दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही आमसभेला संबोधित केलं. इम्रान खान यांनी बोलायला सुरवात केल्यावर UN जनरल असेंब्ली हॉलमध्ये उपस्थित भारतीय प्रतिनिधी बाहेर पडले. यादरम्यान इम्रान खान यांनीही भारतावर खोटे आरोप करत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित केलं. यावेळी इम्रान खान यांनी भारतावर अनेक आरोप केले. त्याचवेळी जेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यूएनमध्ये भाषण सुरू केले तेव्हा भारताने त्यावर बहिष्कार टाकला. यावेळी संयुक्त राष्ट्रांच्या सभागृहात () उपस्थित भारतीय प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती हे बाहेर पडले.

संयुक्त राष्ट्रांत भारताचे स्थायी प्रतिनिधी असलेले टी. एस. तिरुमूर्ती या प्रकरणी माहिती दिली. संयुक्त राष्ट्र ७५व्या आमसभेत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केलेलं विधान कूटनितीक दृष्टीने अतिशय खालच्या पातळीचे होते. त्यांनी निवेदनामध्ये खोटे, वैयक्तिक हल्ले, पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांचा छळ आणि सीमापलिकडील दहशतवादाच्या मुद्द्यांवर डावलत भारतावर टिप्पणी केली, असं तिरुमूर्ती म्हणाले.

भारताने पाक दिले प्रत्युत्तर

भारतानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं. जे दहशतवादाची नर्सरी आणि दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखल्या जातात अशा देशाकडून जगाला मानवाधिकारांवर धडे घेण्याची गरज नाही, असं भारताने सुनावलं.

संयुक्त राष्ट्र संघाच्या जिनेव्हातील मानवाधिकार परिषदेला भारताच्या स्थायी मिशनचे सचिव सेंथिल कुमार यांनी संबोधित केलं. पाकिस्तान भारताविरोधात निराधार आणि अपमानजनक आरोप करण्यासाठी प्रत्येक संधीचा उपयोग करतो. यातून त्यांच्या मनातील नकारात्मकता दिसून येते, असे खडे बोल भारताने पाकिस्तानला ऐकवले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here