३०, ३१ आणि १ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कन्हान, पेंच, बावनथडी, वैनगंगा व इतर उपनद्यांना पूर आल्याने पूर्व विदर्भात पुराचे संकट निर्माण झाले. यात शेतीचे नुकसान झाले असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. कुणाची घरे पडली, तर गुर ढोर वाहून गेली. हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाकडूनही पंचनामे करण्यात आले. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत जाहीर करण्यात आली. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्यांना सानुग्रह मदत, निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्न धान्य वितरित करणे, घर पडझडीच्या नुकसानीसाठी मदत यासह शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून मदत जाहीर करण्यात आली. सुमारे ७१ कोटींची ही मदत अपुरी असून आता पुन्हा १७० कोटी मिळावे यासाठीची प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अशी हवी मदत
जिल्हा : मदतीचा प्रस्ताव
नागपूर : ४७ कोटी ६१ लाख
वर्धा : ६८ लाख
भंडारा : ४५ कोटी ३५ लाख
गोंदिया : १२ कोटी ५७ लाख
चंद्रपूर : ४० कोटी २१ लाख
गडचिरोली : २४ कोटी ४७ लाख
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times