नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र महासभेची वार्षिक बैठक सध्या सुरू आहे. आज या बैठकीला भारताचे संबोधित करणार आहे. आज रात्री ९.०० वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता) पंतप्रधान मोदी महासभेला संबोधित करतील. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीतल्या आपल्या संबोधनात पंतप्रधान जागतिक दहशतवादाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हात घालू शकतात. याशिवाय करोनाशी दोन हात करण्यासाठी भारताची भूमिका जगासमोर मांडू शकतात. पंतप्रधान कार्यालयानं सोशल मीडियावर एका ट्विटद्वारे आजच्या कार्यक्रमाची माहिती दिलीय.

वाचा :

वाचा :

शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी या बैठकीत भारतावर खोटे आरोप केल्यानंतर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली हॉलमध्ये उपस्थित भारतीय प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती थेट बाहेर पडले. पाकिस्तानच्या निवेदनात खोटे आणि वैयक्तिक हल्ले करण्यात आले तसंच पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांचा छळ आणि सीमापलिकडील दहशतवाद या मुद्द्यांना डावलत भारतावर टिप्पणी करण्यात आली, असं तिरुमूर्ती यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या आरोपांना काय उत्तर देतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतानं इम्रान खान यांच्या आरोपांना संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत थेट प्रत्यूत्तर दिलंय. संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये भारताचे फर्स्ट सेक्रेटरी सेंथिलकुमार यांनी टीका करताना ‘पाकिस्तानला दहशतवादाची नर्सन आणि एपिसेंटर’ असं म्हटलंय. भारताविरुद्ध आरोप करताना नेहमीच पाकिस्तानची नकारात्मकता दिसून आल्याचंही सेंथिल यांनी म्हटलं. पाकिस्ताननं नेहमीच त्यांच्या सरकारी खजान्यातून दहशतवादाला प्रोत्साहन दिलंय आणि आजही हा खेळ सुरू असल्याचंही सेंथिल यांनी म्हटलं.

वाचा :

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here