मुंबई: पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्वीट उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी डिलिट केल्यानं शुक्रवारी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं. भारतीय जनता पक्षानं आज याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे.

भारतीय जनता पक्षाचा मूळ अवतार असलेल्या जनसंघाचे सहसंस्थापक दीनदयाळ उपाध्याय यांची काल जयंती होती. त्यानिमित्त भाजपच्या सर्व नेत्यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही ट्वीट करून दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन केलं होतं. मात्र, तासाभरातच त्यांना हे ट्वीट डिलिट करावं लागलं. त्यावरून चर्चा रंगली होती.

वाचा:

अखेर अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केला. ‘हयात नसलेल्या व्यक्तींबाबत चांगलं बोलणं ही आपली संस्कृती व परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. परंतु वरिष्ठांच्या सूचनेनंतर मी ते डिलिट केलं. समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं,’ असं त्यांनी म्हटलं होतं.

वाचा:

अजितदादांच्या याच खुलाशाच्या अनुषंगानं भाजपच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. ‘दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारे ट्विट डिलिट करायला लावणारे अजितदादांचे वरिष्ठ किती ‘इममॅच्युअर’ आणि कोत्या मनाचे आहेत हे आज महाराष्ट्रासमोर आले,’ असं भोसले यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here