मुं
बई- सारा अली खानच्या चौकशीवर अनेकांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. रिया चक्रवर्तीने एनसीबीच्या चौकशीत साराचं नाव घेतलं होतं. फक्त साराच नाही तर तिने अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचंही नाव घेतलं होतं. शुक्रवारी रकुलची चौकशी झाली. तर आज एनसीबीच्या मुख्यालयात साराला बोलावण्यात आलं आहे. सारासोबत असतानाचा सुशांतने ड्रग्जचा हाय डोस घेतला असल्याचं रियाने तिच्या जबाबात म्हटलं होतं. दरम्यान, आता एनसीबीच्या प्रश्नांना सारा कशी उत्तरं देते यावर सारं काही अवलंबून आहे.

एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली सारा

सध्या आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाशचं एनसीबीच्या गेस्ट हाउसमध्ये चौकशी सुरू आहेत. तर सारा आणि श्रद्धा कपूरला एनसीबीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. आता साराही एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचली असून अगदी थोड्यावेळात तिची चौकशी सुरू होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here