मुंबई- बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आजचा (२६ सप्टेंबर) दिवस फार महत्वाचा आहे. अभिनेत्री ला शनिवारी सकाळी १० वाजता एनसीबीने बोलवलं आहे. आणि श्रद्धा कपूरही सकाळी १०.३० वाजता एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचणार आहेत. शुक्रवारी रकुलप्रीत सिंगची चौकशी करण्यात आली. रिपोर्टनुसार, रकुलप्रीतने संपूर्ण दोष रिया चक्रवर्तीच्या माथी मारला. दरम्यान धर्मा प्रॉडक्शनच्या क्षितीज प्रसादची एनसीबीने २० तासांपेक्षा जास्त चौकशी केली. शुक्रवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.

दीपिकाने मान्य केले प्रियांकासोबतचे चॅट, ड्रग्ज न घेण्यावर अजूनही ठाम

दीपिकाने करिश्मासोबतचे ड्रग्ज चॅट केल्याचं एनसीबीकडे मान्य केलं आहे. २८ ऑक्टोबर २०१७ रोजी केलेल्या चॅटमध्ये दोघी ड्रग्जविषयी बोलत होत्या. स्पष्टीकरण देताना दीपिका म्हणाली की, आम्ही आमच्या वर्तुळात डूब घेतो. ही एक प्रकारची सिगारेट असते. यात बर्‍याच गोष्टी असतात. दीपिका म्हणाली की ‘डूब’सारखे शब्द कोड म्हणून वापरले जातात. यात तिने ड्रग्ज असतात की नाही हे मात्र स्पष्टपणे सांगितलं नाही. त्याचवेळी, ड्रग्ज चॅटमध्ये हॅशचा उल्लेख केला आहे. यावरही प्रश्न उपस्थित केला गेला आहे. दीपिका ड्रग्जशी निगडीत कोणत्याच प्रश्नांची थेट उत्तरं देत नाहीए. तसेच अनेक प्रश्नावर ती मौन बाळगणंच पसंत करत आहे.

दीपिकाच्या उत्तरांवर एनसीबी समाधानी नाही

एनसीबीची ५ सदस्यीय टीम दीपिका पादुकोणला प्रश्न विचारत आहे. रिपोर्ट्सनुसार एनसीबी दीपिकाच्या काही उत्तरांवर समाधानी नाही. शुक्रवारी करिश्माने चौकशीत ड्रग्जचा वापर करण्यास नकार दिला होता. त्यांनी फक्त सिगारेट ओढल्याचं सांगितलं होतं. आज जेव्हा दीपिका आणि करिश्मा यांना समोरासमोर बसवून ड्रग्ज चॅटबद्दल प्रश्न विचारले गेले, तेव्हा दोघींनीही ड्रग्ज घेत नसल्याचं सांगितलं. चॅटमध्ये हे वीड/ हॅश कोणासाठी मागवलं असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही.

सारा आणि श्रद्धा यांची एनसीबी ऑफिसमध्ये तर दीपिका-करिश्मा यांची गेस्ट हाऊसमध्ये चौकशी

एनसीबीने सारा अली खान आणि यांना एनसीबीच्या एक्सचेंज बिल्डिंगमधील कार्यालयात बोलावलं आहे. साराचे बॉडीगार्डही सुरक्षा व्यवस्था तपासून गेले. दुपारी १२ वाजेपर्यंत सारा एनसीबीच्या ऑफिसमध्ये येईल असं म्हटलं जात आहे. एनसीबी ऑफिसला जाण्यापूर्वी सारा आणि श्रद्धा दोघीही आपआपल्या वकिलांशी बोलल्या. दुसरीकडे एनसीबीच्या गेस्ट हाऊसमध्ये दीपिका पादुकोणची चौकशी केली जात आहे. मीडियाला टाळण्यासाठी दीपिकाने गेस्ट हाऊसजवळील एका हॉटेलची रूम बुक केली होती. हॉटेलमधूनच ती थेट गेस्ट हाउसला पोहोचली.

एनसीबीने दीपिकाचा फोन घेतला, चार फेऱ्यांमध्ये होणार चौकशी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीची टीम दीपिकाची चार फेऱ्यांमध्ये चौकशी करणार आहे. यातील पहिल्या फेरीत मॅनेजर करिश्माशी झालेल्या चॅटबद्दल चौकशी करणार आहे. दुसर्‍या फेरीमध्ये टॅलेन्ट मॅनेजमेन्ट कंपनी क्वानआणि जया साहाबद्दल चौकशी केली जाईल.

एनसीबी गेस्टहाउसमध्ये पोहोचली दीपिका पादुकोण

दीपिका दिलेल्या वेळेत एनसीबी गेस्टहाउसला पोहोचली. प्रश्न सुरू करण्यापूर्वी दीपिकाला NDPS अॅक्ट समजावला गेला. रिपोर्ट्सनुसार, प्रश्न विचारणाऱ्या टीमला केपीएस मल्होत्रा लीड करत आहेत.

एनसीबी गेस्टहाउससाठी निघाली श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर एनसीबी गेस्ट हाऊससाठी रवाना झाली आहे. तिला सकाळी १०.३० वाजेपर्यंत एनसीबी गेस्ट हाऊस गाठायचे आहे.

दीपिका आणि करिश्मा यांना समोरासमोर बसवून विचारले जातील प्रश्न
एनसीबी दीपिकाच्या मॅनेजर करिश्माची आज पुन्हा चौकशी करणार आहे. करिश्माही एनसीबी गेस्ट हाऊससाठी रवाना झाली आहे. असं म्हटलं जातं की, करिश्मा आणि दीपिका पादुकोण यांना आज समोरासमोर बसवून प्रश्न विचारले जातील. रिपोर्ट्सनुसार, करिश्माने ड्रग्ज चॅटची कबुली दिली आहे. मात्र ड्रग्ज संदर्भात ती फारच मोघम उत्तर देत आहे. शुक्रवारी रकुलप्रीतसमोरही करिश्माची चौकशी करण्यात आली.

दीपिका व्हॉट्सअप ग्रुपची अ‍ॅडमिन होती?
एनसीबी आज दीपिका पादुकोणची चौकशी करेल. दीपिकाची मॅनेजर करिश्मासोबतचे तिचे काही ड्रग्ज चॅट उघडकीस आले होते. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दीपिका करिश्माकडे माल मागत होती. यासोबतच करिश्मा आणि दीपिका ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बोलत होत्या त्या ग्रुपची अॅडमीन दीपिका होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here