मुंबई: अभिनेता मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी हिची बाजू न्यायालयात मांडणारे अॅड. यांनी गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच ठरवून दिलेला निष्कर्ष मांडण्याचा दबाव यंत्रणांवर आणला जात असल्याचं दिसत आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणात ड्रग्जचाही एक अँगल पुढं आला आहे. ड्रग्ज रॅकेटशी रियाचा संबंध असल्याचं एनसीबीचं म्हणणं आहे. सध्या रिया चक्रवर्ती ऑर्थर रोड तुरुंगात नुकतीच तिची न्यायालयीन कोठडीही वाढवण्यात आली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मानेशिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सुशांत प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे व्हायला हवा. त्यासाठी सीबीआयनं स्वतंत्र मेडिकल बोर्ड स्थापन करण्याची गरज आहे. तिथं सुशांतची फॉरेन्सिक तपासणी व्हावी, अशी मागणी मानेशिंदे यांनी केली आहे.

वाचा:

‘सुशांतसिंहचा खून गळा दाबून करण्यात आल्याचं फोटोंवरून २०० टक्के दिसत आहे’, असं सुशांतसिंहचे वकील विकास सिंग यांनी काल प्रसारमध्यमांसमोर सांगितलं होतं. फॉरेन्सिक तपासणी करणाऱ्या एम्स रुग्णालयाच्या पथकातील एका डॉक्टरच्या हवाल्यानं त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्याच अनुषंगानं मानेशिंदे यांनी स्वतंत्र मेडिकल बोर्डाची मागणी केली आहे.

वाचा:

‘केवळ फोटोंवरून विश्लेषण करून मत मांडण्याचा हा ट्रेंड घातक आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच व्हीआरएस घेतल्याचे आपण पाहिले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आधीच ठरवून दिलेला निष्कर्ष मांडण्याचा दबाव यंत्रणांवर आणला जात असल्याचं दिसत आहे. यापुढं असं काही होता कामा नये,’ असं मानेशिंदे यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here