जगप्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी ‘अमेझॉन’चे मालक जेफ बेझॉस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. बेझॉस यांच्याकडे ११७ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती आहे. मात्र बेझॉस यांनी ऑस्ट्रेलियातील नैसर्गिक संकटासाठी १ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर मदत केली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून बेझॉस यांनी ही मदत जाहीर केली. बेझॉस यांच्या संपत्तीच्या तुलनेत ही मदत अगदीच किरकोळ असल्याने जगभरातील नेटिझन्सनी बेझॉस यांच्यावर टीका केली आहे. अनेकांनी बेझॉस यांची संपत्ती आणि मदतीची रक्कम यांची तुलना केली. काहींनी इतर व्यक्तींशी तुलना करून बेझॉस यांना लक्ष्य केले.
बेझॉस याची मदत म्हणजे त्यांच्या एकूण संपत्तीच्या ०.०००६३ % आहे. तुटपुंजी रक्कम मदत म्हणून देऊन माध्यमांमध्ये चर्चेत राहण्याचा आटापीटा का, असा सवाल काही जणांनी केला आहे. ‘अमेझॉन’ने ऑस्ट्रेलियात गेल्या वर्षी १ अब्ज डॉलरची कमाई केली. त्यापैकी कर चुकवेगिरी करून अवघा २ टक्के (२० दशलक्ष डॉलर) कर दिला. जर कंपनीने प्रामाणिक कर भरला असता तर तो ३०० दशलक्ष डॉलर असता, असे क्वासीम रशीद यांनी सांगितले. बेझॉस यांची एक दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत म्हणजे त्यांची अवघी तीन मिनटांची कमाई असल्याची टीका काही नेटिझन्सनी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times