बीजिंग: जागतिक आरोग्य संघटना आणि चीनमध्ये साटलोटं असण्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात येतो. त्याशिवाय, चीनला जागतिक आरोग्य संघटना झुकतं माप देत असल्याचाही दावा इतर देशांकडून करण्यात येतो. अशातच चीनला चाचणी सुरू असलेली लस वापरण्यास जागतिक आरोग्य संघटनेने पाठिंबा दिला होता अशी माहिती समोर आली आहे. चीनच्या एका अधिकाऱ्यानेच यावर भाष्य केले आहे.

चीनने करोनाच्या मुद्यावर आपला आपात्कालीन कार्यक्रम जुलैमध्ये लाँच केला होता. लशीची चाचणी सुरू असताना ही लस लोकांना देण्याच्या निर्णयाला जागतिक आरोग्य संघटनेने चीनला पाठिंबा दर्शवला होता. चीनने याबाबतची माहिती जून महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेला दिली होती, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे अधिकारी झेंग झॉन्गवेई यांनी सांगितले.

वाचा:

तिसऱ्या टप्प्यातील चाचणीशिवाय परवानगी
चीनने हजारो कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना ही लस दिली होती. या कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांना करोनाची बाधा होण्याचा मोठा धोका होता. त्यामुळे ही लस देण्यात आली. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणी न झाल्यामुळे लशीची सुरक्षितता याबाबत ठोस माहिती समोर आली नव्हती. चीनच्या स्टेट कौन्सिलने आपात्कालीन परिस्थिती अंतर्गत लस वापराची परवानगी दिली होती असे झेंग यांनी सांगितले.

वाचा:
WHO चा पाठिंबा

झेंग यांनी सांगितले की, सरकारच्या मंजुरीनंतर २९ जून रोजी चीममध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी या निर्णयामागील गांभीर्य समजून आम्हाला पाठिंबा दिला असल्याचे झेंग यांनी सांगितले. चीनकडून अद्याप या कार्यक्रमाबाबतची संपूर्ण माहिती समोर आली नाही.

वाचा:

चीनच्या नॅशनल बायोटेक ग्रुप आणि सायनोवॅक बायोटेकच्या कमीत कमी तीन लशींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या तिन्ही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तर, CanSino Biologicsने विकसित केलेली चौथी लस चिनी लष्करातील जवानांना देण्यास मंजुरी देण्यात आली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here