नाशिक: राज्य सरकारमधील डझनभराहून अधिक मंत्री व विधानसभा अध्यक्षांनंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ते क्वारंटाइन झाले आहेत.

‘माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन झिरवाळ यांनी केलं आहे. ‘लवकरच करोनावर मात करून मी आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचा:

झिरवाळ यांच्या मुंबई कार्यालयातील एक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांचे कार्यालय आधीच बंद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः आठ दिवस होम क्वारंटाइन राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. ‘मी कोणालाही भेटणार नाही. माझे कार्यालय व कामकाज सुरूच राहील,’ असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. कोणतीही अडचण असल्यास माझे स्वीय सहाय्यक धनराज भट्टड (९६८९३४५१४४) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. आता त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

वाचा:

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे झाले आहेत. याशिवाय, राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनाही करोनाची बाधा झाली आहे. लोकप्रतिनिधींमधील वाढता करोना संसर्ग हा सरकारसाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here