बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोन, श्रद्धा कपूर व सारा अली खान यांची चौकशी आज सुरू आहे. एनसीबीच्या कार्यालयात बंद दाराआड होत असलेल्या या चौकशीचे प्रत्येक मिनिटाचे अपडेट प्रसारमाध्यमांकडून दिले जात आहेत. याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ही माहिती बाहेर कशी येतेय,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
‘मीडियात होत असलेल्या चर्चा वास्तवावर आधारलेल्या नाहीत असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्वत: पुढं येऊन स्पष्ट करायला हवं. ‘एनसीबी’ तसं करत नसेल तर मीडियातून दिली जाणारी माहिती खरी आहे आणि एनसीबीकडून जाणीवपूर्वक ती फोडली जात आहे, असा त्याचा अर्थ होईल. एनसीबी खरोखरच तसं करत असेल तर ते अत्यंत अयोग्य आणि दु:खदायक म्हणावं लागेल,’ असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times