भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे व तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातून विजया रहाटकर व सुनील देवधर यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर, खासदार यांची राष्ट्रीय प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नागपूरचे जमाल सिद्धिकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाचा:
मागील विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून पराभव झाला होता. पक्षातून दगाफटका झाल्यामुळं पराभव झाल्याची त्यांची भावना झाली होती. गोपीनाथ गडावर मेळावा घेऊन त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती. मात्र, पक्षाविरोधात त्या थेट काही बोलल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागेल, अशी चर्चा होती. मात्र, तीही फोल ठरली. त्यामुळं त्या नाराज होत्या. राष्ट्रीय सचिवपदी संधी देऊन त्यांची नाराजी पक्षानं दूर केल्याचं बोललं जात आहे.
वाचा:
फडणवीस सरकारच्या काळात शिक्षणमंत्री असलेल्या विनोद तावडे यांना मागील निवडणुकीत पक्षानं तिकीट नाकारलं होतं. त्यामुळं अनेकांना धक्का बसला होता. हा पक्षाचा निर्णय असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं. तावडे यांनीही पक्षाचा निर्णय मान्य करत कार्यकर्ता म्हणून काम सुरू ठेवलं होतं. त्या संयमाचं फळ त्यांना मिळाल्याचं बोललं जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times