इस्लामाबाद: भारत आणि अमेरिकेनंतर पाकिस्तानही चीनला धक्का देण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनाही टिकटॉकवर बंदी घालण्याची इच्छा आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्री शिबली फराज यांनी ‘द न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. मात्र, डेटा सुरक्षेच्या कारणास्तव इम्रान यांना ही बंदी घालायची नसून त्याचे कारण दुसरेच आहे.

शिबली फराज यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान इम्रान खान हे समाजात वाढत्या अश्लीलतेबद्दल खूप चिंतेत आहेत. सामाजिक धार्मिक मूल्यांना नष्ट करण्यापूर्वी असले प्रकार थांबवणे आवश्यक आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत आपल्याशी १५-१६ वेळा चर्चा केली असल्याचे फराज यांनी सांगितले. समाजात सोशल मीडिया, अॅप्सद्वारे फैलावणाऱ्या अश्लीलतेला रोखण्यासाठी एक व्यापक रणनिती हवी आखणे आवश्यक असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले असल्याचा दावा फराज यांनी केला.

वाचा:

वाचा:

समाजात अश्लीलता वाढल्यानंतर महिलांविरोधात गुन्हे वाढतात आणि कुटुंब व्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळेच समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्या टिकटॉक सारख्या अॅप्सवर बॅन आणण्याची आवश्यकता असल्याचे काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी म्हटले होते, असे फराज यांनी सांगितले.

वाचा:

या वृत्तानुसार, पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाला (पीटीए) इंटरनेट, सोशल मीडिया आणि अ‍ॅप्सला अश्लीलतेपासून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. पीटीएने नुकतीच पाच डेटिंग अॅप्सवर बंदी घातली. या अॅप्समुळे अश्लीलता आणि समलैंगिकता पसरवले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

सुरक्षिता आणि अन्या कारणांवरून भारतानेे टिकटॉकसह २०० हून अधिक अॅप्सवर बंदी घातली आहे. टिकटॉकवर बंदी घातल्यामुळे चिनी कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

19 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here