मुंबई: भाजप नेते व माजी खासदार यांनी ‘जाणता राजा’ या उपमेवरून यांच्यावर आज अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओद्वारे उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे जाणता राजा असल्याचे त्यांनी म्हटले. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा शरद पवार यांचा अभ्यास असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न आदी प्रश्नांची उत्तरे शरद पवार यांच्याकडे असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. शरद पवार यांची करंगळी पकडून अनेकजण राजकारणात आले. अनेकांनी त्यांच्यावर टीका करून राजकारणात प्रस्थापित झाले असल्याचा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

उदयनराजे काय म्हणाले होते?
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटले. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कुणीही गाठू शकणार नाही, मात्र अलिकडे ‘जाणता राजा’ ही उपमाही दिली जाते. मी याचाही निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज हेच आहेत. त्या सो कॉल्ड जाणत्या राजांना ही उपमा कुणी दिली माहीत नाही, अशी टीका भाजपचे नेते, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here