मुंबईः राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर सातत्याने विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच राज्यातील राजकारण पुन्हा फिरणार असल्याचं संकेत वर्तवण्यात येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेनेचे खासदार यांनी आज मुंबईत भेट घेतली. फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळं राज्यात पुन्हा राजकीय भूंकप येणार असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये संजय राऊत आणि फडणवीस यांनी भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट असेल. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही काळांत भाजपने शिवसेना आणि महाविकास आघाडीला अनेक मुद्द्यावरून घेरलं होतं. करोनाची राज्यातील स्थिती, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष, अशा विविध मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. या आरोप- प्रत्यारोपांमुळं एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना- भाजपमध्ये कटुता निर्माण झाली होती. हीच कटुता दूर करण्यासाठी ही भेट असल्याचं, सूत्रांकडून कळतंय.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळं शिवसेना- भाजपमधले बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होत असल्याची चर्चा आहे. तसंच, विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमधील ताणले गेलेले संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here