गेल्या सहा महिन्यात सर्वच क्षेत्रात नोकर कपात दिसून आली आहे. केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील कंपन्यांनी खर्च कपातीचा मार्ग पत्करला. यात काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाईपोटी काही रक्कम दिली. तर काहींनी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले. सवर्साधारणपणे कमर्चाऱ्यांना कामवरून काढून टाकले तर त्याला एक किंवा दोन महिन्यांचे वेतन दिले जाते. मात्र अॅसेंचरने यापुढे जाऊन कमर्चाऱ्यांना सांभाळून घेतले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अॅसेंचरने जे कमर्चारी स्वतःहून राजीनामा देऊन गेले त्यांना कंपनीने सात महिन्यांपर्यंत वेतन भरपाई म्हणून दिले. जो कमर्चारी राजीनामा देत आहे त्याला तीन महिन्याचा नोटीस कालावधी आणि चार महिन्याची वेतन स्वतंत्रपणे कंपनी देत आहे. ज्या दिवशी नोटीस कालावधी सुरु होतो तेव्हापासून पुढील सात महिने त्याच्या बँक खात्यात वेतन नियमित देण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
करोना संकटाचा आयटी सेवा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अॅसेंचरने यापूर्वीच ५ टक्के नोकर कपातीची घोषणा केली आहे. भारतात अॅसेंचरचे दोन लाख कमर्चारी आहेत. यातील किमान १० हजार कमर्चाऱ्यांना नोकरीवरून कमी केले जाणार आहे. यात ज्या कर्मचाऱ्यांची सुमार कामगिरी आहे अशा कर्मचाऱ्यांची सुट्टी होणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times