नागपूर: टिप्परने बोलेरोला धडक दिल्याने दोघे ठार तर दहा जण जखमी झाले. एका जखमीची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास म्हाळगीनगर चौकात घडली. राहुल बन्सी बंजारा (वय २५), भैरुलाल कारुलाल गौड (वय २५),अशी मृतांची तर जगदीश दुर्गा बंजारा (वय २४), गोपाल सिंग (वय २५), बबलू बंजारा, विनोद मा. बंजारा (वय २५), जगदीश बन्सी चावडा (वय २५), अनिल जगदीश गौड (वय २२), तेजराम सब्बा बंजारा (वय ६५), जगदीश तेजराम बंजारा (वय २१) , नरसिंह कनीराम गराशा (वय ३५,सर्व रा. मंदसौर) व चालक फकिरा मोहम्मद बाबूखान (वय ४५ रा.परसोडी खापरी नाका),अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मंगळवारी सकाळी सर्व एमपी-१४-जीबी-१३३२ या क्रमांकाच्या बोलेरोने जात होते. म्हाळगीनगर चौकातील तुकाराम महाराज चौक परिसरात एमएच-३६-एए-१५९५ या क्रमांकाच्या टिप्परने बोलेराला धडक दिली. धडकने बोलेरो रस्तादुभाजकावर धडकली व उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी धाव घेतली. पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित सिद यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना मेडिकलमध्ये दाखल केले. याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी टिप्पर चालकाविरुद्ध प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जगदीश बंजाराचा याची प्रकृती चिंताजनक आहे.

प्लॉस्टीकची भांडे विकण्यासाठी जात होते
सर्व जण तीन महिन्यांपूर्वी नागपुरात आले. ते खापरी भागात राहतात. त्यांचा शहरातील विविध भागात प्लास्टीकची भांडी विकण्याचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे ते भांडी विकायला जात होते. म्हाळगीनगर चौकात रस्ता पार करतानाच बाजूने आलेल्या टिप्परने बोलेरोच्या मागील भागाला धडक दिली. बोलेरोचा वेग अधिक असल्याने ती उलटली.

या भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीत ‘कैद’ झाली आहे. बोलेरोचा वेग अधिक असल्याने चालक नियंत्रण मिळवू शकला नाही. बाजूने येत असलेल्या टिप्परकडेही त्याचे दुर्लक्ष झाल्याने हा भीषण घडल्याचे सीसीटीव्हीत दिसून येते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here