भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. विनोद तावडे, , सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांनी या नव्या जबाबदारीचे स्वागत केलं आहे. ‘पक्षाने आज मला राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची जी संधी दिली आहे, ती पूर्ण ताकदीने, माझ्या अनुभवाने आणि कौशल्याने पार पाडेल. मला संधी दिल्याबद्दल आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी.नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांचा मनापासून आभारी आहे.’, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
वाचाः
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यात राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे व तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांनी पक्षानं तिकीट नाकारलं होतं. त्यामुळं पक्षातील कार्यकर्त्यांना खटकलं होतं. त्यावेळी मात्र, तावडेंनी पक्षाचा हा निर्णय मान्य करत कार्यकर्ता म्हणून काम सुरुच ठेवलं होतं. प्रचारसभेतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. तावडे यांनी त्यावेळी दाखवलेल्या संयमांचं त्यांना फळ मिळालं असल्याची चर्चा आहे.
वाचाः
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times