‘गेल्या नऊ महिन्यांपासून सरकार पडणार अशी चर्चा सुरू आहे. पण फडणवीस, मी आम्ही पुन्हा सरकार बनवणार असं, म्हटलं नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधामुळं पडेल, असं आम्ही म्हणतोय. आम्ही हे सरकार पाडणार नाही, ती आमची संस्कृती नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
‘देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी काही भेट झाल्याची माहिती नाही. आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा वेबिनार आयोजित केला होता. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते, राजकीय क्षेत्रात भिन्न पक्षांचे लोक असे अधूनमधून भेटत असतात. पण त्यातून काहीतरी बातमी निर्माण होईल, असं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये संजय राऊत आणि फडणवीस यांनी भेट घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times