दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी बाल्या हा काळ्या रंगाच्या कारने जात होता. बोले पेट्रोल पंपाजवळ सिग्नल लागल्याने तो थांबवल्या याच वेळी मोपेड व बुलेटवर पाच जण आले. त्यांनी बाल्या याला कारमधून बाहेर काढले. त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात बाल्या खाली पडला. बाल्याचा मृत्यू झाल्याची खात्री पटताना मारेकरी मोपेड व बुलेटने वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विनीता शाहू, गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी बाल्याचा मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून मोरकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. बाल्याच्या हत्येप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times