म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा आकडा रोज कमी होत असल्याने जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मृतांचा आकडाही कमी होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४३ हजारांवर पोहोचला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जूनपर्यंत करोनाचा कहर फारसा नव्हता. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात करोनाने हाहाकार उडवला. या दोन महिन्यात जवळजवळ तीस हजारांवर बाधित आढळले. मृतांचा आकडा हजारांवर पोहोचला. यामुळे जिल्ह्यात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. आठ दिवस मात्र जिल्ह्यात करोनाचा आकडा कमी होत आहे. पूर्वी रोज एक हजारावर बाधित आढळत होते. हा आकडा ५० टक्क्यांनी घटला आहे.

आज दिवसभरात ५४६ बाधित आढळून आले. शुक्रवारी हा आकडा ३६१ होता. मृतांचा आकडा रोज ३० पेक्षा अधिक होता, तोही आता गेले चार दिवस कमी होत आहे. आज दिवसभरात नऊ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला.

प्रशासनाने सुरू केलेली दंडात्मक कारवाई, जनजागृती, लोकांनीच घालून घेतलेली स्वयंशिस्त यामुळे हा आकडा कमी होत असल्याचे दिसत आहे. आत्तापर्यंत १३५४ जणांचा करोनाने बळी घेतला असून ३१ हजार ४७२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ९६११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सं

दरम्यान, राज्यातील
रुग्णांचा आलेख वाढत असताना आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here