राजश्री रवी बंदुर व रोहिणी गंगाप्पा हूलमनी अशी या दोन मयत युवतींची नावे आहेत. प्रेमविवाहातून ही हत्या झाल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती अशी, राजश्री व रोहिणी या दोघीही काळे नटी वाघवडे या गावच्या युवती होत्या. दोघींनीही काही महिन्यापूर्वी प्रेम विवाह केला केला होता. त्या दोघी पतीसमवेत मच्छे या गावात राहत होत्या. दुपारी दोघी फिरायला बाहेर पडल्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या दोन युवकांनी भर रस्त्यावर त्यांचा खून केला.
दोन्ही युवतींचा खुरप्याने गळा कापल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. हत्या केल्यानंतर ते हल्लेखोरांनी तिथून पळ काढला.
पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. या दोघींनी प्रेम विवाह केल्यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याची चर्चा घटनास्थळी होती. पोलिस उपायुक्त विक्रम आपटे यांनी घटनास्थळी भेट देत अधिक चौकशी सुरू केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times