मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते, साताऱ्याचे माजी खासदार यानी ” या वादग्रस्त पुस्तकावर बोलताना शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. शिवसेनेने नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सोईचे राजकारण केले, अशा शब्दांत उदयनराजे यानी शिवसेनेवर टीका केली. महाशिवआघाडीतील ‘शिव’ का काढून टाकले, असा सवाल करतानाच महाराजांचे नाव घेत असाल तर त्या प्रमाणे वागा, असा सल्लाही उदयनराजेंनी शिवसेनेला दिला आहे. शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना ‘आता हे नाव काढून ठाकरे सेना करा’ असे बोलही त्यांनी शिवसेनेला सुनावत शिवसेनेवर पलटवार केले.

‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी यावर बोलावे असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला उत्तर देताना उदयनराजे यांनी शिवसेनेचे महाराजांवरील प्रेम बेगडी असल्याचे दाखले दिले. जेव्हा सोईचे असेल, तेव्हा महाराजांचेन नाव घ्यायचे आणि सोईचे नसेल तेव्हा ते काढून टाकायचे ही शिवसेनेची नीती असल्याचे उदयनराजे म्हणाले. या वेळी उदयराजे यांनी या वादग्रस्त पुस्तकाचाही निषेध केला.

शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारले होते का?

वादग्रस्त पुस्तकावर आता वंशजांनी बोलावे या संजय राऊत यांच्या विधानाची गंभीर दखल घेत उदयनराजेंनी संजय राऊत आणि शिवसेनेवर आपल्या शैलीत जोरदार प्रहार केले. शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारायला आले होते का, असा सवाल त्यांनी केला. यांनी महाशिवआघाडी, शिव का काढून टाकले?, सोई प्रमाणे वापर करायचा सोईप्रमाणे महाराजांचं नाव काढून टाकायचं. शिववडा, हे वडा तो वडा. छत्रपती शिवाजी महाराजांना आदराचे स्थान आहे आणि तुम्ही वडापावला महाराजांचे नाव देता, अशा शब्दांत उदयराजेंनी शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.

पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजेंनी काही शिवसेना भवनाचे फोटो दाखवले. या फोटोत शिवसेना भवनाच्या इमारतीवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वरच्या बाजूस, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो खालील बाजूस होता. या फोटोत महाराज कुठे आणि बाळासाहेब ठाकरे कुठे, असे म्हणत शिवसेनेने महाराजांचा अपमान केल्याचे उदयनराजेंनी अधोरेखित केले. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेतील आमदार गजभिये मुजरा करत असतानाचा फोटोही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला.

‘हे गळ्यात पट्टे बांधलेले लुडबुड करणारे लोक’

काही लोक गळ्यात पट्टे बांधलेले असतात. ते लुडबुड करत असतात असे सांगत मला कुणाचे नाव घेऊन कुणाला मोठे करायचे नाही. तो मोठा कधीच नव्हता… हा ब्लेम गेम सुरू आहे,असेही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here