संबंधित बातम्या :
वाचा :
वाचा :
भारताचा मार्ग… जनकल्याण ते जगकल्याण!
जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याची प्रतिष्ठा आणि याचा अनुभव आम्ही विश्वहितासाठी वापरू. आमचा मार्ग जनकल्याण ते जगकल्याण असा आहे. भारत नेहमीच शांती, सुरक्षा आणि समृद्धीसाठी आवाज उचलत राहील. भारताचा आवाज मानवता, मानव आणि मानवीय मूल्यांचे शत्रू असलेल्या – दहशतवाद, अवैध हत्यारांची तस्करी, ड्रग्ज, मनी लॉन्डरिंग यांच्याविरुद्ध उठेल, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.
गेल्या चार – पाच वर्षांत ४०० दशलक्ष लोकांना बँकिंग सिस्टमशी जोडणं सोपं नव्हतं. परंतु, भारताना ही शक्य करून दाखवलं. आज भारतात गावांतील १५० दशलक्ष घरांत नळानं पाणी पोहचवण्याची मोहीम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भारतानं आपल्या सहा लाख गावांना ब्रॉडबँड ऑप्टिकल फायबरनं जोडण्याच्या एका मोठ्या योजनेची सुरूवात केलीय. करोना संकटानंतर भारत ‘आत्मनिर्भर भारता’ची भूमिका घेत पुढे वाटचाल करतोय. आत्मनिर्भर भारत मोहीम, जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक फोर्स मल्टिप्लायर सिद्ध होईल. सर्व योजनांचा लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचेल, हे भारत सुनिश्चित करत आहे, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मंचावर दिलंय.
करोना महामारीला तोंड देताना आज सगळं विश्वच गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून एका वेगळ्या अनुभवाला सामोरं जातंय. आज आपल्याला सर्वांनाच गंभीर आत्ममंथनाची गरज आहे, असं म्हणतानाच ‘या जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’ असा प्रश्नही पंतप्रधान मोदींनी यावेळी विचारला.
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times