पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहाजहान शेख हे माधवनगर परिसरातील कॉटन मिल चाळीमध्ये एकटेच राहात होते. शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ते आपल्या खोलीमध्ये दार बंद करून बसले. बराच वेळ ते खोलीतून बाहेर पडले नाहीत. यानंतर त्यांच्या भावाने खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिले असता, शहाजहान शेख हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळी पोलिसांना कटर मशीन बाजूलाच पडलेले दिसले. त्या मशिनच्या साहाय्याने गळा चिरून शेख यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, ही आत्महत्या आहे की हत्या याचा शोध घेतला जात आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times