सातारा जिल्ह्यातील कास, कोल्हापुरातील मसाई आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात डोंगर, पठार या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यंदा करोना संसर्गामुळे पर्यटकांची वर्दळ नसल्याने पठारांचे सौंदर्य आणखी खुलले आहे. पावसाळ्यात बहरलेला सह्याद्री पाहणे म्हणजे एक वेगळेच अलौकिक नयनसुख असते. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील पठारे हे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. जागतिक वारसा स्थळात नोंद असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठार, कोल्हापुरातील मसाई, वझरे, मोरजाई आणि सांगली जिल्ह्यात चांदोली परिसरातील पठारांचा यात समावेश आहे. दरवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पठारांवर रानफुलांना बहर येतो. निळी, पिवळी, गुलाबी, पांढ-या अशा रंगीबेरंगी फुलांचा जणू सडाच पडतो. (उद्धव गोडसे)

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांमधील पठारांवर रानफुलांना बहर आला आहे. रंगीबेरंगी फुलांचे गालिचे, अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी, जमिनीवर उतरलेले ढग, दाटलेले धुके, अल्हाददायक वारा आणि हिरव्यागर्द डोंगरदऱ्या पाहता क्षणी जणू स्वर्गच धरतीवर अवतरल्याची अनुभूती येते. सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजे कास पठार. हे पठार साताऱ्यापासून २२ किलोमीटर अंतरावर आहे. जून महिना संपताच या पठारावर विविधरंगी, दुर्मिळ फुलं उमलतात.

पठारांवर अवतरला स्वर्ग; रानफुलांनी बहरले सौंदर्य

सातारा जिल्ह्यातील कास, कोल्हापुरातील मसाई आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरात डोंगर, पठार या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. यंदा करोना संसर्गामुळे पर्यटकांची वर्दळ नसल्याने पठारांचे सौंदर्य आणखी खुलले आहे. पावसाळ्यात बहरलेला सह्याद्री पाहणे म्हणजे एक वेगळेच अलौकिक नयनसुख असते. सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातील पठारे हे निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. जागतिक वारसा स्थळात नोंद असलेले सातारा जिल्ह्यातील कास पठार, कोल्हापुरातील मसाई, वझरे, मोरजाई आणि सांगली जिल्ह्यात चांदोली परिसरातील पठारांचा यात समावेश आहे. दरवर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पठारांवर रानफुलांना बहर येतो. निळी, पिवळी, गुलाबी, पांढ-या अशा रंगीबेरंगी फुलांचा जणू सडाच पडतो. (उद्धव गोडसे)

निसर्गाचा हा अद्भुत नजराणा
निसर्गाचा हा अद्भुत नजराणा

हिरव्यागर्द गवतावर डोलणारे फुलांचे विस्तीर्ण गालिचे पाहताक्षणी मन प्रसन्न करतात. निसर्गाचा हा अद्भुत नजराणा पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करतात. यंदा मात्र करोना संसर्गामुळे पर्यटकांची वर्दळ घटली आहे. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे पठारांचे सौंदर्य आणखी खुलल्याचे दिसत आहे.समुद्र सपाटीपासून एक हजार ते बाराशे मीटर उंचीवर असलेल्या कास पठारावर २८० फुलांच्या प्रजाती पाहायला मिळतात. यातील ३९ प्रजाती दुर्मिळ आहेत. वायुतारा, पांढरा सापकंद, सोमाडा, मोठी सोनकी, कंदील पुष्प, मुसळी, आभाळी, भारंगी, गवती दवबिंदू, सीतेची आसवे, कुरडू अशा अनेक प्रकारची फुले येथे बहरली आहेत.

​मसाई पठारावरील सौंदर्य
​मसाई पठारावरील सौंदर्य

मसाई पठारावर कंदील पुष्प, सीतेचे असवे, गवती दवबिंदू, छोटी आणि मोठी सोनकी यासह काही कीटकभक्षी वनस्पती देखील आहेत. पठारावर पोहोचणारा नागमोडी वळणाचा रस्ता, शेजारीच असलेल्या पन्हाळगडाचे भक्कम बुरुज, पन्हाळ्यावर उतरलेले ढग लक्ष वेधून घेतात. अल्हाददायक वारा, मधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि रंगीबेरंगी फुलांसह पावसाच्या थेंबांनी लगडलेल्या गवताचे गालिचे पायाखाली घालण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. मसाई पठारावरील दोन छोटे तलाव, मसाई देवीचे मंदिर, पांडव दरा, पांडवकालीन लेणी आणि पठारावरून खाली दिसणारे गावांचे विहंगम दृष्य पुन्हा पुन्हा अनुभवावे असेच असते.

करोनामुुळं पर्यटकांची वर्दळ कमी
करोनामुुळं पर्यटकांची वर्दळ कमी

यंदा करोना संसर्गामुळे पर्यटकांची वर्दळ कमी असल्याने पठारांचे सौंदर्य आणखी खुलले आहे. फुलांचा बहर नेहमीपेक्षा जास्त दिवस पाहायला मिळत असल्याचा स्थानिकांना अनुभव आहे. आणखी पंधरा ते वीस दिवस फुलांचा बहर कायम राहील, असे स्थानिक लोक सांगतात. पठारावरील सुंदर विविधरंगी फुलांचा कालावधी आठ ते पंधरा दिवसांचा असतो. सध्या पांढऱ्या रंगाची फुले तुरळक स्वरूपात येण्यास सुरुवात झाली असल्याने तसेच हिरवागार निसर्ग, पावसाची संततधार, गुलाबी थंडी यामुळे पर्यटक कुटुंबासमवेत दाट धुक्यांसह पावसाचा आनंद घेत आहेत.

​पर्यटन थांबल्याने व्यावसायिकांचे नुकसान
​पर्यटन थांबल्याने व्यावसायिकांचे नुकसान

फुलांना बहर येताच दरवर्षी पठारांवर पर्यटकांची वर्दळ वाढते. दोन-तीन महिन्यात लाखो पर्यटक पठारांना भेट देतात. यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले व्यवसाय देखील बहरतात. यंदा मात्र करोना संसर्गामुळे पर्यटनावर निर्बंध झाले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने पर्यटकांनी, निसर्गप्रेमींनी पठारांकडे पाठ फिरवल्याने व्यवसाय ठप्प झाले आहेत. स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून यंदाचा हंगाम वाया गेला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here