जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कॅबिनमध्ये फिजीओलॉजी प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत डांगे हे मद्यधुंद अवस्थेत आले. तुम्ही कोण आहात, तोंडाला लावलेले मास्क काढा, असे सांगितले. तसेच त्यांना शिवीगाळ व दमदाटी करून अधिष्ठात्यांच्या खुर्चीवर येऊन बसले. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात येऊन डॉ. चंद्रकांत डांगे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, जिल्हा पेठ पोलीस पथकाने जिल्हा शासकीय महाविद्यालयात जाऊन डॉ. चंद्रकांत डांगे यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, यापूर्वी २५ मे २०२० मध्ये देखील डॉ. डांगे यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि गाणी ऐकत होते. याबाबत अन्य अधिकारी व कर्मचार्यांनी विचारणा केली असता त्यांनी आपण अधिष्ठाता असल्याचे सांगितले होते. त्यावेळी देखील बराच गोंधळ निर्माण झाला होता. आज पुन्हा तोच प्रकार घडला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times