रायपूर: छत्तीसगडच्या कांकेरमध्ये एका केल्याची घटना घडली आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सरकारकडून कुणीही या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. तर या घटनेनंतर छत्तीसगडमधील पत्रकारांनी संताप व्यक्त केला आहे. पत्रकार कमल शुक्ला हे बेकायदा वाळू उपसा होत असताना वृत्तांकन करत होते. त्याचवेळी काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केली, असे बोलले जात आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी मारहाण केल्याचे पत्रकार शुक्ला यांनीही म्हटले आहे. काँग्रेसच्या आमदारांच्या समर्थकांनी मला आणि आणखी एका पत्रकाराला मारहाण केली. आम्ही बेकायदा वाळू उपसा सुरू असताना वृत्तांकन करत होतो. पोलिसांनी या घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसचा स्थानिक नेता गणेश तिवारी याच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीत पत्रकार शुक्ला यांच्या डोक्यावर जखमा झाल्या आहेत. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वीही पत्रकाराने नगरपालिकेशी संबंधित वृत्तांकन केले होते. त्यावेळीही काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here