वाचा:
सर्वपक्षीय श्रद्धांजली असे स्वरूप असले तरी राष्ट्रावादीचे आमदार , भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह त्यांचे समर्थक आणि भाजपचा एक गट मात्र कार्यक्रमास आला नाही. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस व यांच्यातील राजकीय वैर संपल्याचे सांगितले जात असल्याच्या पार्श्वभूमिवर ही अनुपस्थिती खटकली. यावेळी बोलताना नानासाहेब जाधव म्हणाले, ‘पाच-पाच पातशाह्या आक्रमण करून येत असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांना उभे करत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. नगरमध्येही राठोड यांचे कार्य हिंदुत्वाबाबत असेच होते. ते कार्य छत्रपतींच्या तोडीचे होते,’ असे सांगत त्यांनी राठोड यांच्या हिंदुत्वाच्या कार्याची जाणीव करून दिली.
वाचा:
जिल्हा शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने ही सर्वपक्षीय शोकसभा झाली. यावेळी भाजपसह सर्वच पक्षांचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप किंवा त्यांचे समर्थक मात्र आले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रांजेद्र फाळके मात्र उपस्थित होते तर भाजपचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते. विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह राज्यस्तरावरील काही नेते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सभेला उपस्थित राहिले.
वाचा:
दोन दिवसांपूर्वीच महापालिका स्थायी समिती सभापती निवडीच्या निमित्ताने शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र आल्याचे सांगण्यात येत असतानाच आजच्या सभेला जगताप आणि त्यांच्या समर्थकांची तसेच शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची अनुपस्थिती सर्वानाच खटकली. याशिवाय भाजपमधील एक गटही सहभागी झाला नाही. शोकसभेत सर्वच नेत्यांनी राठोड यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, विधानसभेचे माजी उपसभापती विजयराव औटी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघ संचालक नानासाहेब जाधव, संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, काँग्रेसचे दीप चव्हाण, भाजपचे शहराध्यक्ष भैय्या गंधे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे श्रद्धांजली वाहिली.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times