म. टा. प्रतिनिधी, : एका चोरी प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी सुभाष गायकवाड (वय ४५, रा. जत) याने ठाण्यात सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी (ता. २७) दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर गायकवाड याला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी त्याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलिसांची तारांबळ उडाली.

जत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनचक्की प्रकल्पावरील साहित्य चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी चौकशीसाठी सुभाष गायकवाड या संशयिताला रविवारी सकाळी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी त्याला ठाण्यात बसवून ठेवले होते. रविवारी दुपारी पोलिसांची नजर चुकवून त्याने जवळच असलेल्या सॅनिटायझरच्या बाटलीतील सॅनिटायझर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी त्याच्याकडील सॅनिटायझरची बाटली काढून घेतली. त्यानंतर त्याला उपचारासाठी जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

संशयित गायकवाड हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोर आहे. त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पवनचक्की प्रकल्पाचे साहित्य चोरीच्या गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी त्याने पोलिसांना भीती घालण्यासाठी सॅनिटायझर प्यायले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here