मुंबई: राज्यात आज आणखी ३८० बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे करोनाबळींचा एकूण आकडा ३५ हजार ५७१ इतका झाला आहे तर आतापर्यंत ४१८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू अन्य कारणांनी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ( Latest Updates )

वाचा:

करोना मृत्यूंचा आकडा अजूनही मोठाच आहे. आज ३८० मृत्यूंची नोंद झाली असून त्यातील २०० मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, ९६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत तर उर्वरित ८४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत, असे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.६६ टक्के इतका आहे.

वाचा:

राज्यात नवीन करोना बाधित रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यांचे प्रमाण पुन्हा एकदा उलटे झाले आहे. राज्यात आज दिवसभरात १८ हजार ५६ नवीन रुग्णांची नोंद झाली तर १३ हजार ५६५ रुग्ण आज करोनावर मात करून घरी परतले. आतापर्यंत एकूण १० लाख ३० हजार १५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता (Recovery Rate) ७६.९१ टक्के इतकं झालं आहे.

वाचा:

> राज्यात आतापर्यंत ६५ लाख ६५ हजार ६४९ चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील १३ लाख ३९ हजार २३२ (२०.४० टक्के) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

> राज्यात सध्या २ लाख ७३ हजार २२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत तसेच सौम्य लक्षणे व लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत.

> जिल्ह्यात सर्वाधिक ५८ हजार ९३२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर जिल्ह्यात सध्या २९ हजार ९७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर शहर आणि उपनगर जिल्ह्यांत अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा २६ हजार ७१६ इतका झाला आहे.

> मुंबई पालिका हद्दीत असलेल्या विविध रुग्णालयांतून आज ४ हजार १९० रुग्ण करोनावर मात करून घरी परतले तर दिवसभरात २२६१ नवीन रुग्णांचे निदान झाले. ४४ करोना बाधितांना आज प्राणास मुकावे लागले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here