वाचा:
हळूहळू का होईना पण एनडीएमधील महत्त्वाचे घटकपक्ष आता एनडीएमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचा एकमताच्या विचारावर विश्वास नसल्यामुळे आपला भांडवलशाही अजेंडा पुढे रेटण्यासाठी ते देशातील मजूर आणि शेतकऱ्यांवर अन्यायकारक अशी धोरणे राबवत सुटले आहेत. त्याचा मोठा फटका या वर्गाला सहन करावा लागत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यांनी सांगितले.
वाचा:
भाजप सरकार लवकरच देशातील सर्व नफ्यात असणाऱ्या पीएसयूएसच्या किल्ल्या या मोठ्या भांडवलदारांकडे सुपूर्द करण्याच्या तयारीत आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. शिरोमणी अकाली दलाने आता जाणीवपूर्वक एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला अनेकांचा पाठिंबा मिळेल असेही महेश तपासे म्हणाले. भाजपने दिलेल्या खोट्या आश्वासनांबाबत देशातील लोक आता जागृत होत आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकार सामान्य माणसाच्या अपेक्षांच्या कसोटीत पूर्णपणे पराभूत झाल्याचे दिसून येत आहे, असेही तपासे पुढे म्हणाले.
वाचा:
पवारांचं अभिनंदनासाठी खास ट्विट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा यांनी आधीच ट्विटरच्या माध्यमातून अकाली दलाचं अभिनंदन केलं आहे. कृषी विधेयकांचा विरोध करण्यासाठी एनडीएतून बाहेर पडण्याचा जो निर्णय आपण घेतला आहे त्यासाठी तुमचे अभिनंदन, अशा शब्दांत पवार यांनी अकाली दलाचे नेतृत्व करत असलेल्या बादल कुटुंबाची स्तुती केली आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याबद्दल आभार, असेही शरद पवार यांनी पुढे नमूद केले आहे. अकाली दलाचे सर्वेसर्वा प्रकाशसिंग बादल, पक्षाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल, खासदार हरसीमरत कौर बादल यांचा ट्विटमध्ये उल्लेख करत पवार यांनी देशाच्या राजकारणातील या महत्त्वाच्या घडामोडीवर भाष्य केलं आहे. शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातील एक ‘पॉवरफुल’ आणि सर्वात अनुभवी नेते असून पवारांकडून अकाली दलाची झालेली स्तुती अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times