औरंगाबाद: भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी असून शिवसेनेचे हिंदुत्व हे धर्मनिरपेक्ष असल्याचे मत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त कवाडे औरंगाबाद येथे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसह शिवसेनादेखील सहभागी झाली आहे. शिवसेनेच्या समावेशामुळे अनेकांना धक्का बसला होता. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना कवाडे यांनी मत व्यक्त केले. भाजप आणि शिवसेना हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या हिंदुत्ववादात फरक असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे हिंदुत्व हे मनुवादी आहे. मनुवादी हिंदुत्व हे समानता, धर्मनिरपेक्षता हे मूल्यं नाकारत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, शिवसेनेचे हिंदुत्व हे भाजपच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वात धर्मनिरपेक्षतेचे मूल्य आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा शिवसेनेकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, याबाबत विचारले असता प्रा. कवाडे यांनी हे आघाडीचे सरकार आहे. मित्रपक्षांना सन्मानपूर्वक वाटा मिळेल, अशी अपेक्षा होती पण ती पूर्ण न झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. पुढे विस्तार होईल, आशा जिवंत आहे, असे सुचक विधानही त्यांनी केले. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बोलताना त्यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेत निषेध व्यक्त केला. तर शरद पवार यांना जाणता राजा म्हटलं तर कसं चालतं? असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता प्रा. कवाडे यांनी थेट उत्तर न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेल्या कामामुळे त्यांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणतात, असे नमूद केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here