सांगली: करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोहीम राबविण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करा, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी संसर्गासंदर्भात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

वाचा:

जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत प्रशासनाने जनजागृती करावी. मोहिमेंतर्गत तपासणीसाठी घरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास नागरिकांनी खरी माहिती देऊन सहकार्य करावे. कोणीही दुखणे अंगावर काढू नये. सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे. प्रत्येक गावाने करोना मुक्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. गावात एकाही व्यक्तीला करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी घ्यावी. करोनामुक्त गाव ही मोहीम राबविल्यास संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. जिल्हा प्रशासनाने याबाबत सविस्तर आराखडा तयार करावा.’

वाचा:

करोना रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध खाटा, ऑक्सिजन पुरवठा, व्हेंटिलेटर, बिलांचे व उपचाराचे ऑडिट करण्याच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत मंत्री पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. हॉस्पिटलबाहेर दरपत्रक लावण्याबरोबरच रूग्णांच्या नातेवाईकांना उपचाराबाबत वेळोवेळी माहिती द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी , पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, आदी उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here