म. टा. विशेष प्रतिनिधी

सर्वसामान्य ग्राहक जादा दराच्या वीजबिलाने त्रस्त आहेत. नोकऱ्या नाही, कंपन्या बंद होत आहे, त्यामुळे घर कसे चालवायचे अशी विवंचना त्यांच्यासमोर आहेत. अशावेळी सामान्य जनतेला वीजबिलात दिलासा देण्याऐवजी मंत्र्यांच्या बंगल्यांना वीजबिलात सवलत देते. हे म्हणजे सर्वसामान्य गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्याना वीज बिल बेस्ट प्रशासनाने पाठवलेले नाही. राज्यातील जनतेला मोठ्या रकमेची बेस्ट आणि महावितरणने पाठवली आहेत. वीजबिलात सवलत मिळेल अशी अपेक्षा होती पण सामान्यांकडून ही बिले वसूल केली जात आहेत, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

गेल्या २५ ते ३० वर्षे शिवसेना व भाजप सोबत युती करून राजकारण सुरू होते, ही त्यांची मजबुरी होती की हिंदुत्व व राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजपबरोबर शिवसेना होती याचे उत्तर संजय राऊत यांना द्यावे लागेल. नैसर्गिक युती भाजपबरोबर असताना त्यांना बाजूला ठेवून महाविकास आघाडीशी सरकार बनविणे ही शिवसनेची मजबुरी आहे का, याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. सोयीप्रमाणे बोलणे हे जनतेला पसंत पडत नाही, असे दरेकर म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here