मुंबई: बिहारचे निवृत्त पोलीस महासंचालक हे संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसनं महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘फडणवीसांनी गुप्तेश्वर पांडे यांच्या उमेदवारीला विरोध करायला हवा,’ असा सल्ला काँग्रेसनं दिला आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यात बॉलिवूडच्या काही कलाकारांसह बिहार पोलिसांचाही समावेश होता. त्यावेळी बिहारचे पोलीस महासंचालक असलेले गुप्तेश्वर पांडे सातत्यानं मुंबई व महाराष्ट्र पोलिसांना लक्ष्य करत होते. एखाद्या राजकीय नेत्याच्या अविर्भावात ते ठाकरे सरकारवर टीका करत होते. त्याचवेळी, पांडे हे बिहारच्या निवडणुकीत एखाद्या पक्षाचे उमेदवार म्हणून दिसतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पांडे यांनी अलीकडेच नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात प्रवेश केला आहे. त्यांना जेडीयूकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

वाचा:

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी ट्वीट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून काम पाहणाऱ्या फडणवीसांकडून सावंत यांनी एक अपेक्षा व्यक्त केली आहे. ‘देवेंद्र फडणवीस हे बिहार भाजपाचे प्रभारी असताना जर मुंबई पोलीसांचा अपमान करून महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या गुप्तेश्वर पांडे यांना भाजपाचा सहयोगी पक्ष तिकीट देत असेल तर ते अत्यंत दुःखद असेल. फडणवीसांनी निकराने विरोध केला नाही तर महाराष्ट्रात त्यांना जनतेच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागेल,’ असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here