वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

‘करोना विषाणूच्या संसर्गाविरोधात सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण करण्यात देशातील लोकसंख्या अजून सक्षम नाही. ”च्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात असे सूचित करण्यात आले आहे,’ असे यांनी रविवारी येथे सांगितले. यामुळेच करोना संसर्गाविरुद्ध लढण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे. तसेच प्रार्थनास्थळांमध्येही मास्क घालण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘संडे संवाद’दरम्यान सोशल मीडियावर संवाद साधताना हर्षवर्धन म्हणाले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ही संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पुन्हा संसर्ग झाल्याच्या अहवालांची तपासणी आणि संशोधन करीत आहे. मात्र, पुन्हा संसर्ग होण्याची प्रकरणे सध्या नगण्य आहेत. तरीही सरकार ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. हर्षवर्धन पुढे म्हणाले की, लवकरच जाहीर करण्यात येणाऱ्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, कोणत्याही प्रकारची रोगप्रतिकारशक्ती मिळवण्यापासून आपण खूप दूर आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले पाहिजे.

वाचा :

वाचा :

वाचा :

टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भातील नागरिकांच्या शंका त्यांनी यावेळी दूर केल्या. तसेच सलून, हेअर स्पामध्ये जाताना योग्य काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्याचप्रमाणे कोविड-१९बाबत लोकांमध्ये नेहमी जनजागृती करण्यास त्यांनी सांगितले.

रेमडेसिवीर आणि प्लाझ्मा थेरपीसारख्या उपायांच्या व्यापक वापराबाबत सरकारने सूचना केल्या आहेत. खासगी रुग्णालयांनाही या उपचारांचा नियमित वापर करण्याविरोधात सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काय सांगतेय आकडेवारी?

दरम्यान, सोमवार सकाळपर्यंत ६० लाख ७४ हजार ७०३ रुग्ण आढळलेत. यातील तब्बल ५० लाख १६ हजार ५२१ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. यातील ९ लाख ६२ हजार ६४० रुग्णांवर उपचार सुरू आहे. मात्र एव्हाना ९५ लाख ५४२ जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावलेत. भारतात दररोज सरासरी ९० हजार रुग्ण आजारातून बरे होत आहेत. देशात आत्तापर्यंत संक्रमणमुक्त झालेल्या रुग्णांचा एकूण आकडा हा अॅक्टिव्ह केसेसच्या तुलनेत पाच पटीनं अधिक आहे.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here