म. टा. प्रतिनिधी, : बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही तालुक्यातील अमरापूर येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्या आणि शर्यतीत सहभाग घेणाऱ्या अकरा जणांवर कडेगाव पोलिसांनी दाखल केला. रविवारी सायंकाळी वनविभागाच्या रिकाम्या जागेत शर्यतीचे आयोजन केले होते. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी शर्यत थांबवून आयोजकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. शर्यतीसाठी बैलांना घेऊन आलेली सहा वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरापूर गावच्या हद्दीत काही लोकांनी रविवारी सायंकाळी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शर्यत रोखली. बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने पोलिसांनी आयोजकांसह सहभागी झालेल्या बैलगाडी मालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत राजेंद्र गणपती चिंचकर (वय २५, रा. मसूर, ता. कराड, जि. सातारा), सयाजी बाळकृष्ण यादव (३६, रा. वाघेरी, ता. कराड) अजमुद्दिन चंदूलाल मुलाणी (३७, रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली) धोंडीराम राजाराम शिरतोडे (२०, रा. आळसंद, खानापूर, जि. सांगली), प्रल्हाद सदाशिव शिरतोडे (३८, रा. कमळापूर, कडेगाव), बाबासो बाळा शिरतोडे (४२, रा. आळसंद), साहिल जिंद कारंडे (२५, रा. शिरगाव, ता. कडेगाव), शैलेश शंकर चव्हाण (२०, रा. तडसर), प्रवीण मानाजी सूर्यवंशी (२२, रा. तडसर), सागर बबन जाधव (३०, रा. गोंदी, कराड, जि. सातारा), गौरव गाथा थोरवे (२६ गिरिजाशंकर वाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी घटनास्थळावरून सहा वाहने जप्त केली. यात चार टेम्पो, तर दोन पिकअप टेम्पोंचा समावेश आहे. शर्यतीच्या ठिकाणी बैलजोड्या घेऊन येण्यासाठी या वाहनांचा वापर झाला होता. पोलीस नाईक सुनील जालिंदर पाटील यांनी फिर्याद दाखल केली. यानुसार बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणाऱ्यांसह सहभागी झालेल्या अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चौकशीनंतर ताब्यात घेतलेल्या सर्वांना सोडून देण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याचे कडेगाव पोलिसांनी सांगितले.

आणखी बातम्या वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here