मुंबई: ‘अनेक लोक गळ्यात चैनी घालतात. गॉगल लावतात, पण मास्कसाठी पैसे नसल्याचं सांगतात. ही मानसिकता चुकीची असून मास्क न घालणारे किलर आहेत,’ असं परखड मत मुंबईच्या महापौर यांनी नोंदवलं आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मास्क घालणंही सक्तीचं करण्यात आलं आहे. असं असतानाही काही लोक मास्क न घालता वावरत असतात. त्या पार्श्वभूमीवर ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना महापौर पेडणेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वाचा:

‘मुंबईतील सुमारे दोन टक्के नागरिक कळत नकळत इतरांना मारण्याचं काम करत आहेत. हे अति आत्मविश्वास असलेले लोक आहेत. इतर ९८ टक्के लोकांच्या जिवाला ते धोका निर्माण करत आहेत. मुंबईकर चांगले आहेत. पण काही जणांमध्ये बेफिकरीपणा आहे. ज्यांच्या घरात मृत्यू होतो, त्याला याचा त्रास होतो आहे,’ असं महापौर म्हणाल्या.

वाचा:

‘राज्यात टप्प्याटप्प्यानं अनलॉक होत आहे. मुंबईतही काही सवलती दिल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी मुंबईकरांना अधिक सावध राहण्याचं व पुरेशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ‘लोकांनी मास्क लावला नाही तर करोनाला हरवायला खूप वेळ लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here