मुंबईः नेत्या यांना एक शदीह भगतसिंह यांच्या जयंतीनिमित्त ट्वीट करणं चांगलंच महागात पडलं आहे. ट्विटरवर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी शहीद भगत सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक फोटो ट्विट केला होता. यात शहीद भगत सिंह यांचा फोटो होता तर नाव चंद्रशेखर आझाद यांचं होतं. नेटकऱ्यांच्या ही चूक लक्षात येताच त्यांनी सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

प्रियंका चतुर्वेदी यांनी सोमवारी एक ट्विट केलं होतं. ‘दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे- चंद्रशेखर आजाद’, असा मथळा लिहला होता. तर फोटो भगतसिंह यांचा वापरला होता. प्रियंका यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी हे ट्विट डिलीट केलं असून या प्रकरणावर त्यांनी बाजूदेखील मांडली आहे. मात्र, प्रियंका यांच्या एका चुकीमुळं त्यांना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारचे माध्यम सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी मात्र त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘शहीद भगत सिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. पण काही जण चंद्रशेअर आझाद आणि भगतसिंह यांच्यातील फरक कळत नाही, हे लज्जास्पद आहे.’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

प्रियंका चतुर्वेदी यांनी दिलं स्पष्टीकरण

मृत्यूंजय कुमार यांच्या ट्वीटला प्रियंका चतुर्वेदी यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. ‘अशा अनेक चुका आहेत ज्या पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकांउटवरदेखील झाल्या आहेत,’ असा पलटवार चतुर्वेदी यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here